थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Jay Pawar - Rutuja Patil wedding) युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाह सोहळा ३० नोव्हेंबर रोजी मुंबईत पार पडला. या लग्न सोहळ्याला पवार कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. या सोहळ्याला ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार पवार कुटंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. मात्र अजित पवार या लग्नसोहळ्याला उपस्थित नव्हते.
अजित पवार निवडणुकीच्या प्रचार सभेत व्यस्त असल्या कारणाने युगेंद्र पवार यांच्या लग्नसोहळ्यासाठी ते उपस्थित नव्हते. आता अजित पवार यांचे धाकटे सुपूत्र जय पवारांचा लग्नसोहळा आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा 4, 5 आणि 7 डिसेंबर रोजी बहरीनमध्ये पार पडणार आहे. मात्र जय पवार यांच्या लग्नाला श्रीनिवास पवार जाणार नसल्याची माहिती मिळत आहे.
सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे दिल्लीत अधिवेशनात सहभागी असल्याने ते देखील जाणार नाहीत तर श्रीनिवास यांच्या पत्नी शर्मिला पवार ही लग्नसोहळ्याला जाणार नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे फक्त लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. श्रीनिवास पवार हे युगेंद्र पवार यांचे वडील असून अजित पवार यांचे छोटे भाऊ आहेत.
Summery
जय पवार यांच्या लग्नाला श्रीनिवास पवार जाणार नाहीत
सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे दिल्लीत अधिवेशनात सहभागी असल्याने जाणार नाहीत
तर श्रीनिवास यांच्या पत्नी शर्मिला पवार ही जाणार नाहीत