महाराष्ट्र

अशोक चव्हाण सत्तेत असल्याने मुक्ताफळं उधळतात; चव्हाणांनी समाजाचं वाटोळं केलं – विनायक मेटे

Published by : Lokshahi News

अशोक चव्हाण सत्तेत असल्याने मुक्ताफळं उधळतात; चव्हाणांनी समाजाचं वाटोळं केलं असे विनायक मेटे म्हणाले. मोर्चे काढून काहीच निष्पन्न होणार नाही. या प्रश्नी संसदेत प्रश्न उचलण्याची गरज असल्याचं अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे वक्तव्य केलं होतं. आणि यालाच उत्तर देत आमदार विनायक मेटे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधलाय.

चव्हाण सत्तेत असल्याने मुक्ताफळं उधळत आहेत. चव्हाण यांच्यामुळेच मराठा आरक्षण गेलं, त्यांच्या एवढं समाजाचा वाटोळं कोणीच केलं नाही. एवढं करून सुद्धा त्यांना शहाणपण सुचत नसल्याचं आमदार मेटे यांनी म्हटलं आहे. राजकारण करण्याचे काम चव्हाण करतात, जे सरकारच्या हातात आहे. तेवढं त्यांनी करावं, मग दुसऱ्याकडे बोट दाखवावं असं म्हणत मेटे यांनी चव्हाणांवर टीका केलीये.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Latest Marathi News Update live : एक रोमांचक सोहळा महाराष्ट्र अनुभवणार आहे, संजय राऊतांचं प्रतिपादन

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी