महाराष्ट्र

सिंधुदुर्ग बँकेच्या निकालास सुरुवात;संतोष परब हल्लाप्रकरणातील संशयित असलेला मनिष दळवी विजयी

Published by : Lokshahi News

Sindhudurg District Central Co-operative Bank Election: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची काल निवडणूक पार पडली. निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) पॅनल आणि महाविकास आघाडीत मोठी चुरस पाहायला मिळाली. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी पार पडत आहे.  संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आणि भाजपचे उमेदवार मनिष दळवी या निवडणुकीत विजयी झाले आहेत. पहिलाच निकाल भाजपच्या बाजूने लागल्यानंतर या निवडणुकीच्या सर्वच्या सर्व निकालांबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महाविकास आघाडीचे दुसरे उमेदवार सतीश सावंत आणि भाजपचे उमेदवार विठ्ठल देसाई यांना समसमान मते मिळाली आहेत. त्यानंतर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात सतीश सावंत पराभूत झाले आहेत.त्यांच्या पराभवामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राणे समर्थकांनी फटाके फोडून विजयाचा जल्लोष सुरू केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

ShahRukh Khan : किंग खानला 'या' चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर! राणी मुखर्जी, विक्रांत मेस्सी यांचाही सन्मान

Anil Parab : "गृहमंत्रीच कायदा सुव्यवस्थेचे भक्षक" अनिल परब यांचा घणाघात

Mahadevi elephant : महादेवी हत्तीणीच्या पुढच्या पायाला फ्रॅक्चर; वनतारा पशुवैद्यकीय तज्ञांची माहिती

Lionel Messi In India : फुटबॉलचा सम्राट आता क्रिकेटच्या मैदानात उतरणार! वानखेडेवर विराट-सचिनसोबत पाहायला मिळणार थरारक सामने