थोडक्यात
आज छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ
पोलिसांनी घोषणाबाजी करुन गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतलं
(Devendra Fadnavis) आज छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जात आहे. दरम्यान या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असताना काही जणांनी घोषणाबाजी करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्या व्यक्तींनी हैदराबाद गॅझेट रद्द करावा आणि ओबीसींवर अन्याय होतोय अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी घोषणाबाजी करुन गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,
"मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा कार्यक्रम सुरु असताना काही लोक येऊन नारेबाजी करतात, यापेक्षा मोठा स्वातंत्र्यसंग्राम सेनानींचा अपमान असू शकत नाही" पण ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल. चारच माणसं येतात आणि अशाप्रकारे नारेबाजी करुन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात हे योग्य नाही. मी त्यासंदर्भात काहीच बोलणार नाही. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.