महाराष्ट्र

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत मुंबईतील एवढ्या रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट

भारतीय रेल्वेच्या वतीने अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत अपग्रेड आणि आधुनिकीकरणासाठी देशभरातील 1309 स्थानकांचे काम केले जाणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

भारतीय रेल्वेच्या वतीने अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत अपग्रेड आणि आधुनिकीकरणासाठी देशभरातील 1309 स्थानकांचे काम केले जाणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्‍चिम रेल्वेच्या सहा विभागांमध्ये पसरलेल्या 66 रेल्वे स्थानकांची पायाभरणी केली जाणार आहे.

4886 कोटींपेक्षा जास्त खर्च करून रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. यामध्ये 46 स्थानके गुजरात राज्यात आहेत, तर 11 महाराष्ट्रात आणि 9 मध्य प्रदेशात आहेत. महाराष्ट्रातील 11 स्थानकांपैकी मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, लोअर परळ, प्रभादेवी जोगेश्‍वरी, मालाड आणि पालघर या 8 उपनगरीय स्थानकांची पायाभरणी करण्याकरिता 233 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेतील आठ स्थानकांपैकी जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणी आणि आधुनिकीकरणासाठी 50 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मलाड रेल्वे स्थानकाच्या पुनर्व विकासासाठी 35 रुपये कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. लोअर परेल रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 30 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. मरीन लाईन रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 28 कोटी रुपये देण्यात आला आहे. ग्रँड रोड रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 28 कोटी रुपये, चर्नी रोड रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 23 कोटी रुपये, प्रभादेवीसाठी 21 कोटी आणि पालघर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास आणि पुनर्बांधणीसाठी 18 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. असे मिळून एकूण 233 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रात पश्चिम रेल्वेतील 8 स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Beed Govind Barge : माजी उपसरपंच आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट! नर्तिका पूजा गायकवाडला गायकवाडला न्यायालयीन कोठडी

Google Gemini News Trend : गुगल जेमिनी काय ऐकत नाही! रेट्रो-थ्रीडी मॉडेल फोटोनंतर जेमिनी घेऊन आलं नवा ट्रेंड

Dhananjay Munde : धनंजय मुंडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; बंजारा समाज आक्रमक

America Tariff News : 'टॅरिफ संकट आता...' मोठं नुकसान टळलं! भारतासाठी दिलासादायक बातमी