Ahilyanagar School 
महाराष्ट्र

Ahilyanagar School : अहिल्यानगरमधील काही शाळांना 'या' तारखेला सुट्टी

राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Ahilyanagar School) राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अहिल्यानगर जिल्ह्यात 11 नगरपरिषदा आणि 1 नगर पंचायत अशा एकूण 12 सार्वत्रिक निवडणुका होत आहे. यामध्ये संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, श्रीरामपूर, पाथर्डी, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा नगरपरिषद तसेच नेवासा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान होत आहे.

मतदानाच्या तयारीसाठी 1 डिसेंबरलाच मतदान केंद्रांवर मतदान साहित्य येणार आहे. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या पालिका हद्दीतील मतदान केंद्र म्हणून नियुक्त सर्व शाळांना 1 आणि 2 डिसेंबरला सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्याची माहिती मिळत आहे.

Summery

  • अहिल्यानगरमधील काही शाळांना 1, 2 डिसेंबरला सुट्टी

  • मतदान केंद्र असलेल्या शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर

  • जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आदेश

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा