(Sonia Gandhi) काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती खालावल्यामुळे रविवारी रात्री त्यांना दिल्लीमधील सर गंगाराम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पोटाच्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयातील गॅस्ट्रो विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
सध्या त्यांच्यावरती उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे असे निवेदन रुग्णालयाने जाहीर केले आहे. मागच्या आठवड्यात शिमला दौऱ्यावरती असताना सुद्धा सोनिया गांधी यांना त्रास होत असल्यामुळे त्यांना इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज रुग्णालयामध्ये दाखल केले होते.
मागच्या काही दिवसांपूर्वी देखील सोनिया गांधी यांची तब्बेत बिघडली होती अशी माहिती समोर आली आहे. आता त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.