थोडक्यात
सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यात मोठे नुकसान
सोलापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोनू सूद पुढे सरसावला
व्हिडीओच्या माध्यमातून सोनू सूदने लोकांना मदतीसाठी केलं आव्हान
(Sonu Sood ) अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा समाजसेवेच्या कामात पुढे सरसावला आहे. आता सोलापूरच्या पूरग्रस्तांना आधार ठरत आहे.सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले.
या पार्श्वभूमीवर सोनू सूदने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो म्हणतो, “सोलापूरमध्ये पुरामुळे अनेक कुटुंबांचे हाल झाले आहेत. आमची टीम या कुटुंबांपर्यंत अन्न व औषधांच्या किट्स पोहोचवत आहे. अनेक स्वयंसेवक आणि संस्था या उपक्रमाला हातभार लावत आहेत. त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
"आपण सर्वांनी मिळून या कुटुंबांना पुन्हा उभं करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. लवकरच मी स्वतः सोलापूरमध्ये येऊन भेट घेणार आहे.” व्हिडीओच्या माध्यमातून सोनू सूदने लोकांना मदतीसाठी आव्हान केले आहे.
सोनू सूद आता सोलापूरमध्ये असून त्या ठिकाणीचे काही व्हिडिओ तो सोशल मीडियावर शेअर करत आहे.सोनू सूदची चॅरिटी फाउंडेशन सध्या स्थानिक लोकांसोबत काम करत असून, पूरग्रस्तांना तातडीची मदत दिली जात आहे. यावेळीही त्याच्या मदतीची चर्चा चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. सोशल मीडियावर अनेक जण त्याचे कौतुक करताना दिसत आहेत.याच्याआधी देखील सोनू सूद याने कोरोना महामारीच्या संकटात लोकांना मदत केली होता.