(Shrirampur) अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. श्रीरामपूर येथील एमआयडीसीमध्ये सुमारे 14 कोटी रुपयांचा अल्प्राझोलम (कृत्रिम ड्रग्ज) या अंमली पदार्थाचा साठा पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.
आजवरची राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असून यामध्ये 14 कोटींचे तब्बल 20 पोती ड्रग्ज जप्त केले गेले आहे. बुधवारी मध्यरात्री या पदार्थाचा साठा श्रीरामपुरात एका टेम्पोतून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी टेम्पोचा शोध घेऊन तो पकडला. यामध्ये अल्प्राझोलमचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.