महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC/HSC Result 2022) बारावीचा निकाल गेल्या आठवड्यात जाहीर झाला. यामुळे आता दहावीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळातर्फे (MSBSHSE) दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. माध्यमांमधील बातम्यांनुसार बोर्डा दहावीचा निकाल 15 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर केला जाईल, असं काही दिवसांपुर्वी सांगितलं होतं.
दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान झाली होती. परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेला 14 लाख 49 हजार 660 विद्यार्थी सहभागी झाले होते. दहावीच्या परीक्षा ऑफलाइन झाल्या होत्या 15 ते 20 जूनपर्यंत दहावीचा निकाल (SSC/HSC Result 2022) जाहीर होण्याची शक्यता आहे.
कुठे पाहाल निकाल?
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लोकशाहीच्या वेबसाईटवर व महाराष्ट्र बोर्डाचा वेबसाईटवर पाहता येणार आहे.
स्टेप 1 : www.mahresult.nic.in
www.maharashtraeduction.com वर लॉन ऑन करा
स्टेप 2 : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
स्टेप 3 : तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
स्टेप 4 : तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा