महाराष्ट्र

एसटी संपकरी राज ठाकरेंची भेट घेणार

Published by : Lokshahi News

एसटी कर्मचारी आंदोलनावरुन राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.कारण एसटी आंदोलनावरुन भाजप विरूद्ध सरकार असा संघर्ष पेटताना दिसतो आहे. दरम्यान यात आता एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या भेट घेणार आहेत.

भाजप नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. तर मनसेने सुद्धा या संपाला पाठिंबा दिला होता. मात्र मनसेचा एकही पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाला नाही. आता एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ 'कृष्णकुंज'वर धाव घेणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता ते दाखल होणार आहेत.

दरम्यान आज कृती समितीची परीवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक पार पडली. मात्र या बैठकीत ही संपावर तोडगा निघाला नाही. उद्या गुरूवारी पुन्हा बैठक होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ambernath Accident : धक्कादायक! अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी पडले; संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

Wardha Crime : शिक्षणासाठी पैसे नसल्याने 17 वर्षीय तरुणीने नैराश्यातून जीवन संपवले

Panchayat Season 5 : प्रेक्षकांना बघायला मिळणार आजी-माजी सरपंचांची लढाई; पुढील वर्षात येणार पंचायत 5 सीझन

Jitendra Awhad On Ashish Shelar : आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया म्हणाले, "मराठी माणसाची तुलना पहलगामच्या घटनेशी.."