SBI क्रेडिट कार्ड धारकांना मोठा धक्का; 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, 'या' सेवा होणार बंद  SBI क्रेडिट कार्ड धारकांना मोठा धक्का; 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, 'या' सेवा होणार बंद
महाराष्ट्र

SBI क्रेडिट कार्ड धारकांना मोठा धक्का; 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, 'या' सेवा होणार बंद

एसबीआय क्रेडिट कार्ड धारकांसाठी नवे नियम; 1 सप्टेंबरपासून रिवॉर्ड पॉईंट्सवर मर्यादा

Published by : Riddhi Vanne

देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी नवा नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. 1 सप्टेंबर 2025 पासून हे बदल अमलात येणार असून, यामुळे अनेकांना धक्का बसणार आहे. एसबीआय कार्डने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार काही कार्डवरील रिवॉर्ड पॉईंट्सची सुविधा बंद केली जाणार आहे.

काय बंद होणार?

1 सप्टेंबरपासून लाइफ स्टाइल होम सेंटर एसबीआय कार्ड, लाइफ स्टाइल होम सेंटर एसबीआय कार्ड सिलेक्ट आणि लाइफ स्टाइल होम सेंटर एसबीआय कार्ड प्राइम या कार्ड्सवर विशिष्ट व्यवहारांवरील रिवॉर्ड पॉईंट्स मिळणे थांबणार आहे. यामुळे या कार्डधारकांना आधी मिळणारे फायदे बंद होणार आहेत.

ऑनलाईन गेमिंग आणि सरकारी सेवांवर बदल

नवीन नियमानुसार 1 सप्टेंबरपासून ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवर केलेल्या व्यवहारांवर कोणतेही रिवॉर्ड पॉईंट्स मिळणार नाहीत. तसेच, क्रेडिट कार्डद्वारे सरकारी सेवांसाठी केलेल्या पेमेंटवरही रिवॉर्ड पॉईंट्स मिळणार नाहीत. हे नियम मर्चंट व्यवहारांवर देखील लागू होणार आहेत.

16 सप्टेंबरपासून CPP प्लॅनमध्ये बदल

फक्त 1 सप्टेंबरच नाही तर 16 सप्टेंबरपासून देखील एक नवा बदल लागू होणार आहे. कार्ड सुरक्षा योजना (CPP) यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता एसबीआय कार्ड ग्राहकांचे प्लॅन नुतनीकरणाच्या तारखेनुसार अपडेट होऊन नवीन वेरिएंटमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत. या संदर्भात ग्राहकांना एसएमएस आणि ई-मेलद्वारे किमान 24 तास आधी सूचना दिली जाईल.

जुलै आणि ऑगस्टमध्येही झाले बदल

एसबीआय कार्डने यापूर्वीही नियमांमध्ये मोठे बदल केले होते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात काही क्रेडिट कार्डवर मिळणारा कॉम्प्लिमेंटरी हवाई अपघात विमा काढून टाकण्यात आला होता. हा विमा कव्हर 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत होता. यात SBI Elite आणि SBI Prime या कार्डधारकांचा समावेश होता.

ग्राहकांसाठी महत्त्वाचे संकेत

सतत बदलले जाणारे हे नियम पाहता SBI क्रेडिट कार्ड धारकांनी आपल्या कार्डचा वापर करताना आणि नवीन व्यवहार करताना नियमांचे बारकाईने वाचन करणे आवश्यक ठरणार आहे. अन्यथा आधी मिळणाऱ्या सवलती व फायदे गमवावे लागू शकतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा