थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( State Election Commission) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. सभा, प्रचार जोरदार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्य निवडणूक आयोगाकडून प्रचाराची मुदत वाढवण्यात आली आहे. नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली आहे. 1 डिसेंबरच्या रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार असल्याची माहिती मिळत आहे. या निर्णयामुळे उमेदवारांना आता दिलासा मिळणार असून प्रचाराला देखील वेळ मिळणार आहे.
Summery
राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराची मुदत वाढवली
1 डिसेंबरपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली