Ladki Bahin Yojana 
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी; आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची होणार पडताळणी

(Ladki Bahin Yojana ) लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर तपासणी करण्यात आली.

Published by : Team Lokshahi

(Ladki Bahin Yojana ) लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर तपासणी करण्यात आली. या तपासणीत 2652 महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाने घेतलेल्या तपासणीतून हा प्रकार उघडकीस आला.

1 लाख 60 हजार 559 महिला व पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांची युआयडी डेटा तपासणी करण्यात आली. यातून निष्पन्न झाले की 2652 महिला कर्मचाऱ्यांनी ऑगस्ट 2024 ते एप्रिल 2025 दरम्यान प्रतिमाह 1,500 रुपये प्रमाणे ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतला. याचा एकूण आर्थिक फायदा सुमारे 3 कोटी 58लाख रुपये इतका झाला. शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, तरीही संबंधितांनी अर्ज भरला आणि या योजनेचा फायदा घेतला.

याच पार्श्वभूमीवर आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची तपासणी लवकरच केली जाणार आहे, असल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच तपासणीत आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. 8 लाख 85 हजार महिलांनी ‘नमो शेतकरी योजना’ आणि ‘लाडकी बहीण योजना’ दोन्हीचा लाभ घेतला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसामुळे 366 रस्ते बंद, 929 ठिकाणी वीजपुरवठा खंडित

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा