मार्डच्या लढ्याला यश आले आहे. प्रत्येक निवासी डॉक्टरला 1 लाख 21 हजार रुपये देण्यात येणार आहेत.सर्व निवासी डॉक्टरांना कोविड काळात त्यांनी बजावलेल्या रुग्ण सेवेसाठी प्रत्येकाला 1 लाख 21 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
काही दिवसांपूर्वी राज्यभरात निवसी डॉक्टर्स आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले होते. संपूर्ण राज्यभर हा संप झाल्यामुळे आरोग्यसेवेवर ताण पाडण्याची शक्यता होती. या संपाची दखल घेत शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालय, तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व निवासी डॉक्टरांना कोविड काळात त्यांनी बजावलेल्या रुग्ण सेवेसाठी प्रत्येकाला 1 लाख 21 हजार रुपये देण्यात येणार आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेसोबत बैठक घेऊन त्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता वैद्यकीय शिक्षण विभागाने एका शासन निर्णय काढला आहे.