थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Bhai Jagtap) महापालिका निकालानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी वर्षा गायकवाड यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती.
मुंबई महानगरपालिकेचे एकंदरीत निकाल पाहता काँग्रेसच्या आत्ताच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. याच पार्श्वभूमीवर आता भाई जगताप यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.
मुंबई अध्यक्षांबद्दल मीडियात केलेल्या वक्तव्यावर पुढील ७ दिवसांत लेखी स्पष्टीकरण देण्याचे आदेश त्यांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र प्रभावी रमेश चैन्निथला यांच्या आदेशावरून भाई जगतापांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Summary
मुंबईतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये भूकंप
वर्षा गायकवाडांविरोधातील वक्तव्य, भाई जगतापांना पक्षाची नोटीस
मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाडांनी राजीनामा द्यावा, भाई जगतापांनी केली होती मागणी