थोडक्यात
वीज कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप
वीज कंपन्यांचे खासगीकरण विरोधात संप
कंपन्यांच्या पुनर्रचनेला कर्मचाऱ्यांचा विरोध
(Electricity Employee Strike) राज्यातील वीज कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आली आहे. आजपासून वीज कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. वीज कंपन्यांचं खासगीकरण आणि पुनर्रचनेविरोधात कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारल्याची माहिती मिळत आहे.
या राज्यव्यापी संपात राज्यातील सुमारे ८६ हजार वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि ४२ हजार कंत्राटी वीज कामगार असे एकूण सव्वा लाखाहून अधिक कर्मचारी सामील होणार आहेत. वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात आजपासून तीन दिवस हे कर्मचारी संपावर जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता, अधिकारी कृती समितीने दिली आहे.
वीज कंपन्यांच्या खाजगीकरणाला आणि पुनर्रचनेला विरोध करण्यासाठी राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आह. या संपामुळे राज्याच्या वीज पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.