Nurses Strike  team lokshahi
महाराष्ट्र

Nurses Strike : राज्यभर परिचारिकांचं आजपासून काम बंद आंदोलन

रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता

Published by : Shweta Chavan-Zagade

खासगीकरणाला (Privatization) विरोध दर्शवण्यासाठी व इतर मागण्यासाठी परिचारिका संघटनेच्या वतीने आज गुरुवारपासून 26 आणि 27 मे पर्यंत राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. त्यामुळं याचा मोठा परिणाम राज्यभरातील रुग्णसेवेवर पाहायला मिळू शकतो. बुधवारी संचालकांच्या बैठकीत परिचारिकांच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय न घेतला गेल्याने परिचारिकांनी आजपासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे. याशिवाय तोडगा न निघाल्यास 28 मेपासून बेमुदत आंदोलन (Nurses Agitation) करणार असल्याचा इशारा परिचारिंकांनी दिला आहे.

23 मे पासून सुरू झालेल्या या आंदोलनाचे पडसाद राज्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. रुग्णसेवा देत एक तास आंदोलन 23 मे ते 25 मे परिचारिकांनी केले मात्र आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आता पूर्णपणे काम बंद आंदोलन परिचारिकांनी पुकारले आहे त्यामुळे याचा परिणाम रुग्णसेवेवर देखील होण्याची शक्यता आहे. परिचारिकांनी वारंवार शासन दरबारी आपल्या मागण्या मांडल्या. मात्र त्या पूर्ण न झाल्याने संतप्त झालेल्या परिचारिकांनी आंदोलन पुकारले आहे.

आजपासून सुरू झालेल्या काम बंद आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्यातील सर्वच रुग्णालयातील शाखेच्या परिचारिका सहभागी होणार आहेत. रुग्णसेवेवर याचा संभाव्य गंभीर परिणाम होऊ शकतो.तसे झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन व शासन जबाबदार राहील असा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?