Stepmother killed 3 and half year old son Team Lokshahi
महाराष्ट्र

सावत्र आईच्या मारहाणीत साडे तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; डोंबिवली हादरली!

डोंबिवली टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; महिलेला केली अटक.

Published by : Vikrant Shinde

अमजद खान| कल्याण-डोंबिवली: डोंबिवलीत घडलेल्या एका घटनेमुळे शहर हादरून गेलंय .सावत्र आईने अमानुषपणे केलेल्या मारहाणीत साडे तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय . अंतीमादेवी असं या निर्दयी महिलेचं नाव आहे .या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात अंतीमा देवी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तिला अटक केली आहे.

डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी परिसरात संजय जयस्वाल हे पत्नी अंतीमा देवी व आपल्या मुलांसह राहतात. अंतीमा ही त्यांची दुसरी पत्नी असून मुलगा कार्तिक हा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा आहे .चहा विक्रीचा व्यवसाय करत संजय आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.अंतिमादेवी ही नेहमी सावत्र मुलं कार्तिक आणि त्याच्या भावाला मारहाण करायची. काल दुपारी तीन च्या सुमारास छोट्या कारणावरून तीने साडेतीन वर्षाच्या कार्तिकला लाथा बुक्यांनी आणि वायरने बेदम अमानुषपणे मारहाण केली.

या जबर मारहाणीत कार्तिक बेशुद्ध पडला. त्याला केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले गेले. परंतू कार्तिक ची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात दाखल केले . मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात कार्तिकला अमानुषपणे मारहाण करुन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अंतिमादेवी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे टिळक नगर पोलिसांनी अंतिमा देवीला अटक केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा