थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Jalgaon) जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मध्ये पराभूत अपक्ष उमेदवाराच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक 3 मधील पराभूत झालेले अपक्ष उमेदवार राकेश बोरसे यांच्या घरावर ही दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी अज्ञातांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून दगडफेक करणारा अज्ञात फरार झाला असून याप्रकरणी पोलिसांकडून अज्ञातांचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Summary
चाळीसगावमध्ये पराभूत उमेदवाराच्या घरावर दगडफेक
दगडफेक करणारे अज्ञात फरार
अज्ञातांविरोधात पोलिसात तक्रार दाखल