hsc result  team lokshahi
महाराष्ट्र

HSC Result : बारावीच्या परीक्षेत नापास, विद्यार्थ्याची आत्महत्या

Published by : Shweta Chavan-Zagade

अमोल धर्माधिकारी : पुणे | इयत्ता बारावीच्या (HSC Result) परीक्षेत नापास झाल्याने एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. आज (8 मे) बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला अन् निकाल पत्रिकेत नापास झाल्याचे समजताच इमारतीच्या वरच्या दिशेने जाऊन त्या विद्यार्थ्याने उडी मारून आत्महत्या केली. निखिल लक्ष्मण नाईक असं विद्यार्थ्याचं नाव आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा 12वीचा निकाल आज जाहीर झाला. दरम्यान निखिल नाईक हा बारावीचा ऑनलाईन निकाल लागणार हे समजल्यावर निकालाबाबत तो खुपच उत्सुक होता. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन निकाल जाहीर होताच, पत्रिकेत नापास झाल्याचे समजताच निखीलने इमारतीच्या वरच्या दिशेने जाऊन वरून उडी मारून आत्महत्या केली. निखिल हा गरवारे महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होता. निखिलचे वडील आचारी तर आई घरकाम करत आहेत. निखिलच्या जाण्यामुळे त्याच्या आई- वडिलांना जबर धक्का बसला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा