महाराष्ट्र

अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांची स्कुलबस उलटली; अपघात सीसीटीव्हीत कैद

बस चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अंबरनाथ : येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कुलबस उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंबरनाथ पूर्वेच्या ग्रीन सिटी संकुलानजीक हा अपघात झाला आहे. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थाळी धाव घेतली. या बसमध्ये जवळपास 17 ते 18 विद्यार्थी होते. सुदैवाने विद्यार्थ्यांना गंभीर इजा झाली नाही. दरम्यान, बस चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अंबरनाथच्या रोटरी शाळेची एक खासगी मिनी स्कुल बस आज सकाळी पावणेसातच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेण्यासाठी ग्रीन सिटी संकुलात आली. रिव्हरवूड इमारतीसमोरील उतारावर या बसचालकाने बस रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस पलटली. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी बसवर चढून तातडीनं सगळ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. या घटनेत दोन विद्यार्थ्यांना किरकोळ जखमी झाले आहेत. तर, इतर विद्यार्थ्यांना सुदैवानं कोणतीही इजा झालेली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, रोटरी शाळा व्यवस्थापनानं ही बस आमच्या शाळेची नसून शाळेचा बससोबत कोणताही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. ही बस खासगी असून पालक त्यांच्या सोयीनुसार या बसने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत असल्याचं शाळा व्यवस्थापनानं स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे स्थानिक रहिवाशांनी बस मालकविरोधात संताप व्यक्त केला. या बसचा इन्शुरन्स नव्हता, तसंच बसची अवस्थाही अतिशय मोडकळीस आलेली होती, त्यामुळे यात बस मालकाचा निष्काळजीपणा असल्याचं सांगत पालकांनी संताप व्यक्त केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक