महाराष्ट्र

‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’च्या जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी काढली प्रभातफेरी

शाळकरी विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. यात नागरिकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’अभियान मुंबई उपनगर जिल्ह्यातील पंधरा वॉर्डमध्ये 1 डिसेंबरपासून सुरूवात झाली आहे. प्रत्येक वॉर्डमधील स्थानिक लोकप्रतिनिधी, शासनाचे सर्व विभाग, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी या अभियानात श्रमदान करून ते यशस्वी करूया, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले होते. यानुसार शाळकरी विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. यात नागरिकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला.

मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेनुसार माझी मुंबई-स्वच्छ मुंबई या अभियानांतर्गत धडक स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. महानगर पालिकेच्या पी/दक्षिण विभागातील सहाय्यक आयुक्त राजेश आक्रे यांच्या नेतृत्वाखाली अभियान राबवण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ अभिनेता सुनिल बर्वे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. यामध्ये विभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला.

‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’हे अभियान मुंबई महापालिकेमार्फत राबविण्यात येणार असून त्यामध्ये सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थांचा सक्रिय सहभाग आहे. प्रत्येक शनिवार, रविवारी श्रमदान करावे, मुंबई उपनगरातील पंधरा वॉर्ड मध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना, स्वयंसेवी संस्था, शासनाचे सर्व विभाग, नागरिक यांना ज्या-ज्या वॉर्डमध्ये शक्य होईल तिथे आपला परिसर, शाळा, महाविद्यालय, पोलीस स्टेशन, सार्वजनिक ठिकाणे, सागरी किनारे यांची स्वच्छता करावी, असा आवाहन लोढा यांनी केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा