(Buldhana) आजपासून विदर्भातील शाळा सुरु होत आहेत. त्यानिमित्त राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहांगीर येथील प्राथमिक शाळेवर विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहे. मात्र दादा भुसे पोहोचण्याच्या आधीच शिक्षकांनी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळा झाडणे, कचरा उचलणे यासांरख्या कामाला लावल्याचे पाहायला मिळत आहे.
शिक्षण मंत्र्याच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांकडूनच साफसफाई करुन घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंत्री दादा भुसेंच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनाच कामाला जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मंत्री दादा भुसे सिनगावमधील शाळेत दाखल झाले असून शिक्षणमंत्र्यांकडून या बातमीची गंभीर दखल घेण्यात आली आहे. शिक्षणमंत्री दादा भुसेंनी कारवाईचा इशारा दिला आहे.