Maratha Kranti Morcha Team Lokshahi
महाराष्ट्र

मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाचा फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांचा आत्महत्येचा प्रयत्न

Published by : Sagar Pradhan

नुकताच काही दिवसांपूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. त्यानंतर राज्यात मराठा क्रांती मोर्चामध्ये आणि राजकीय वर्तुळात एकच गोंधळ सुरु होता. ते प्रकरण चालू असताना औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी फेसबुक लाईव्हवर विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ राज्यात सुरु झाली.

काय म्हणाले लाईव्हवर केरे पाटील?

रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्ह करत आपली भूमिका मांडली होती.आपल्या जवळच्या लोकांची माफी मागत. शेवटचं लाईव्ह करतो सर्वाना जय शिवराय असे विधान त्यांनी यावेळी केले. मी आतापर्यंत मराठा बांधवांसाठी लढत आलो. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी मी प्रयत्न करत आलो आहे. माझं काम प्रामाणिक असल्यामुळे अनेकदा त्याची दखल घेण्यात आली. मात्र काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमुळे माझी बदनामी झाली असे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काय आहे नेमकं ऑडिओ क्लिप प्रकरण?

काही दिवसांपूर्वी मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकाची कथित एका ऑडिओ क्लिपने राज्यात खळबळ उडवेळी होती. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी राजकीय नेत्यांकडून कोट्यवधी रुपये घेतल्याचा उल्लेख या ऑडीओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे. सोबतच राज्यातील मोठ-मोठ्या नेत्यांच्या नावाचा सुद्धा या क्लिपमध्ये उल्लेख पाहायला मिळाले होते. एकूण 27 मिनट 25 सेकंदाची या ऑडीओ क्लिपमध्ये मोठमोठे खुलासे करण्यात आले होते. मराठा क्रांती मोर्च्याच्या दोन महत्वाच्या समन्वयकांच्या संभाषणाची ही क्लिप असल्याचा दावा केला जात होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Adani Group : अदानी समूहाच्या कंपन्यांना सेबीकडून क्लीन चिट

Rohit Pawar : "कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर पाऊल उचलणार", कोकाटेंनी दिलेल्या मानहानीच्या नोटीसवर रोहित पवारांचं वक्तव्य

Gold Silver Rate : ग्राहकांची चिंता मिटली! लवकरच सोने-चांदीच्या भावात होणार मोठी घसरण; कधी ते जाणून घ्या

Chhagan Bhujbal : "अंतरवालीतील दगडफेक शरद पवारांच्या..." अंतरवालीतील दगडफेकीवर भुजबळांनी केला पडदाफाश