महाराष्ट्र

प्रेम प्रकरण; विषारी इंजेक्शन घेऊन तरुणीचं सुसाईड

Published by : Lokshahi News

संजय देसाई । सांगलीत प्रेम प्रकरणातून विषारी इंजेक्शन घेऊन तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आम्रपाली सतीश कांबळे वय 20 असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तसेच आत्महत्ये पूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. या प्रकरणाबाबत मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

सांगलीतील मराठे मिल चाळ रमा माता आंबेडकर कॉलनीत राहणाऱ्या आम्रपाली सतीश कांबळे या तरुणीने विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली. आम्रपाली खाजगी रुग्णालयात नर्सिंगचे काम करत होती.तिचे एका मुलासोबत प्रेम संबंध होते. याची माहिती कुटूंबाला मिळाल्यानंतर त्यांनी दोघांच्या लग्नाला होकारही दिला होता. मात्र सोमवारी अचानक तिने राहत्या घरी विषारी इंजेक्शन स्वतःला टोचून घेत आत्महत्या केली. दरम्यान या घटनेची माहिती कुटुंबियांना मिळाल्यानंतर नातेवाईकांनी तिला उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.  

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...