थोडक्यात
सु-तारा अॅग्रो प्रा. लि.मध्ये सुनेत्रा पवार, जय पवार पार्टनर
सु-तारा अॅग्रो कंपनी सध्या बंद
रेवती बिल्टकॉन प्रा. लि.मध्ये सुनेत्रा पवार, प्रतिभा पवार पार्टनर
(Parth Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राइजेस कंपनीने 1800 कोटी रुपये किंमत असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यातच आता एक नवी माहिती समोर येत आहे ती म्हणजे सु - तारा - अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सुनेत्रा अजित पवार आणि जय अजित पवार पार्टनर आहेत मात्र ही कंपनी सध्या बंद आहे.रेवती बिल्टकॉन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सुनेत्रा अजित पवार आणि प्रतिभा शरदचंद्र पवार पार्टनर असल्याची माहिती मिळत असून रेवती बिल्टकॉन कंपनीचं कामकाज सक्रिय आहे.
रेवती बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडची माहिती
रेवती बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड ही एक खाजगी कंपनी
23 डिसेंबर 1981 रोजी कंपनीची स्थापना
सध्याचे संचालक सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रतीभा पवार
'शेअर्सद्वारे मर्यादित कंपनी' म्हणून वर्गीकृत
गेल्या 44 वर्षांपासून प्रामुख्याने वित्त व्यवसायात
ही कंपनी फायनान्स देते आणि सध्या कंपनीचे कामकाज सक्रिय
कंपनीचे अधिकृत भांडवल 1 लाख रुपये, पेड अप भांडवल 100 टक्के आहे.