महाराष्ट्र

अंधश्रद्धेच्या आहारी गेला आणि 56 लाखाना बुडाला, सुशिक्षित डोंबिवलीतील घटना

Published by : Shweta Chavan-Zagade

अमजद खान | कल्याण : झटपट पैशांच्या लालसेपोटी अंधश्रद्धेच्या आहारी जात डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिक तब्बल 56 लाख रुपये गमावून बसल्याची घटना समोर आली आहे. डोंबिवलीतील ठाकुर्ली परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील याना पैशाचा पाऊस पाडून 5 कोटी मिळवून देतो असे आमिष दाखवत तांत्रिक टोळीने त्यांची 56 लाख रुपयाची फसवणूक केली .या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे.अशोक गायकवाड,रमेश मुकणे, संजय भोळे यांच्यासह एकाला ताब्यात घेतलं आहे .

डोंबिवलीमध्ये राहणारे सुरेंद्र पाटील या बांधकाम व्यावसायिकाला त्याच्या दावडी गाव येथील कार्यालयात अशोक गायकवाड नावाच्या व्यक्तीची भेट झाली .अशोक गायकवाड याने पैशाचा पाऊस पाडणारा व्यक्ती आपल्याकडे असून थोडाफार खर्च करण्याची तयारी दाखविल्यास 5 कोटी रुपयाचा पाऊस कार्यालयात पडेल असे आमिष दाखवले. 5 कोटीच्या आमिषाला बळी पडून सुरेंद्र पाटील यांनी होकार दिला .अशोक गायकवाड याच्यासह पाच जणांनी त्यांच्या कार्यालयात 25 जून रोजी सकाळी पूजा करण्याचे ठरवले .पूजा करण्याच्या बहाण्याने पाटील यांच्याकडून 56 लाख रुपये पूजेच्या ठिकाणी ठेवण्यास सांगितले.बंडखोर आमदारांना दिलासा, 11 जुलैपर्यंत आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात कोणतीही कारवाई होणार नाही.

पूजा पूर्ण झाल्यानंतर पाटील यांना कार्यालय असलेल्या इमारतीला पाच प्रदक्षिणा मारत मंतरलेले पाणी शिंपडन्यास सांगितलं .पाटील बाहेर पडले त्यानंतर पुन्हा ऑफिस मध्ये आले असता हे पाच ही जन कार्यालयातून पैसे घेवून पळून गेले होते .आपली फसवणूक झाल्याचे लक्षात झाल्यानंतर याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली . मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकी बरोबरच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी कृत्य याना प्रतिबंध व निर्मुलन व काळा जादू नियमाचे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कार्यालयातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे या मधील चार जणांना ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. अशोक गायकवाड ,रमेश मुकणे, संजय भोळे आणित्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलं आहे .

Rahul Gandhi : रायबरेलीतून राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर

मंधाना-शेफालीचा धमाका! टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक; बांगलादेशचा धुव्वा उडवून T20 मालिका जिंकली

"धेर्यशील माने किंवा इतर उमेदवार महत्त्वाचे नाहीत, कारण...", हातकणंगलेत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Daily Horoscope 3 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष ३ मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना