थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Winter Session ) आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात हे अधिवेशन होणार आहे. विरोधक सरकारला अनेक मुद्द्यांवरुन घेरण्याच्या तयारीत आहेत.
हिवाळी अधिवेशनात 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. महसूल-वन विभागाकडून सर्वाधिक मागणी सादर करण्यात आली असून महसूल-वन विभागाकडून 15 हजार 721 कोटींची मागणी करण्यात आली. तर पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 15 हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली.
तसेच कृषिपंप, यंत्रमाग, वस्त्रोद्योग ग्राहकांसाठी 9 हजार 250 कोटींची मागणी आणि लाडक्या बहिणींसाठी 6 हजार 103 कोटींची मागणी केली असून एसटी महामंडळाच्या मदतीसह परिवहन विभागासाठी २००८ कोटींची तर कुंभमेळ्यासाठी ३ हजार कोटी रुपयांची मागणी सादर करण्यात आली आहे.
Summery
हिवाळी अधिवेशनात 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
महसूल-वन विभागाकडून सर्वाधिक मागणी सादर
महसूल-वन विभागाकडून 15 हजार 721 कोटींची मागणी