राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने आरोप करत त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी सदर महिलेला सापळा रचून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पोलिस खोलवर तपास करत आहेत. याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खळबळजनक आरोप केला होता. आरोपी महिला व तिच्यासोबतचे सहकारी थेट शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझी भाषण, सोशल मीडिया अंकाऊट्स हे पारदर्शक आहेत. कोणत्याही व्यक्तीबद्दल मी कधीही वैयक्तिक वक्तव्य केलं नाही. कारण माझ्यावर तसे संस्कार नाही. त्यामुळे माझी सर्व भाषण डेटा स्पीक्स लावून ऐका.
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या प्रकरणात मी एक वक्तव्य केलं होतं मला चांगल आठवत आहे. एक कोटी रुपये सदर प्रकरणातील महिलेने घेतल्याचा आरोप केला आहे . मला चिंता होती की, एक कोटी रुपये रोख रक्कम जेव्हा नोटबंदी झालेली होती तेव्हा कशी आली. सर्वचं जर बॅंकिंग सिस्टममध्ये आले आहेत. मग1 कोटी रुपयांची रक्कम आली कुठून? मला चांगल आठवतंय मी प्रसार माध्यमांमध्ये असं बोलले होते की, मी सदर प्रकरण केंद्राच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे घेऊन जाणार आहे. नक्की व्यवहार झाला कसा? हे सर्वांना समजले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये नाव घेतलेल्या कोणत्याही व्यक्तींला मी कधीही भेटले नाही. मी पारदर्शक आयुष्य जगते. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा माझ नाव घेतलं. तेव्हा आश्चर्च वाटल. कोर्टच्या ऑर्डरवर मी भाष्य करणार नाही. मुख्यमंत्र्याना चौकशी करायची असेल तर माझ सहकार्य असेल, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत