महाराष्ट्र

सूरज चव्हाण अजित पवारांच्या भेटीला; अजितदादांकडून सूरजला मोठं गिफ्ट

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा विजेता सूरज चव्हाण सध्या चांगलाच चर्चेत आहे. सूरजने ‘बिग बॉस मराठी 5’सीझनचं विजेतेपद पटकावून सर्वांचं मन जिंकलं.

Published by : shweta walge

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा विजेता सूरज चव्हाण सध्या चांगलाच चर्चेत आहे. सूरजने ‘बिग बॉस मराठी 5’सीझनचं विजेतेपद पटकावून सर्वांचं मन जिंकलं. सूरजने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकत भरघोस मतांनी बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचं विजेतेपद पटकावलं आहे. आता सूरज चव्हाण हा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलाय.

सूरज चव्हाण यांने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी काही मिनिटे दोघांमध्ये चर्चा देखील झाली. बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर अजित पवार यांच्याकडून सूरज चव्हाण याचा सत्कार देखील करण्यात आलाय. यावेळी सुरजच्या डायलॉगने अजित पवार खळखळून हसले देखील. यावेळी अजित पवार यांनी मोठे गिफ्ट सूरजला दिल्याचे बघायला मिळतंय. एकदम चांगले घर अजित पवार हे सूरजला बांधून देणार आहेत. स्वत: अजित पवार यांनी म्हटले की, मी तुला घर बांधून देईल. आपले स्वत: चे चांगले घर असावे असे आपले स्वप्न असल्याचे सांगताना अनेकदा सूरज दिसला.

अजित पवार यांनी शाल, पुप्षगुच्छ आणि शिवाजी महाराज यांनी मुर्ती देत सूरज चव्हाण याचा सत्कार केला. सूरज चव्हाण बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर त्याला बिग बॉसच्या निर्मात्यांकडून 14 लाखांचे बक्षिण मिळाले आहे. फक्त 14 लाखच नाही तर इतरही बरीच बक्षिसे सूरज चव्हाण याला मिळाली आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा