महाराष्ट्र

Sushma Andhare : सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंच्या उपस्थित हाती शिवबंधन

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला.

Published by : Shweta Chavan-Zagade

आज सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून शिवसेनेला आंबेडकरी चळवळीतला नवा चेहरा मिळाला आहे. फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वक्त्या प्रा. सुषमा अंधारे (Sushma Andhare) या शिवसेनेत (Shiv Sena) जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (ramdas athawale) भाजप सोबत गेले. मात्र, आता पुन्हा एकदा सुषमाताई अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिक शक्ती – भिम शक्ती असा नारा ऐकायला मिळणार आहे.

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधलं. त्यांच्यासोबत आणखी काही महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा