संदीप गायकवाड | वसईच्या समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. भुईगाव आणि कळंब परिसरातील 15 माईल्ड अंतरावर ही बोट थांबलेली आहे. खडकाला लागून थांबली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दिवसभर ही बोट कुणाची आहे आणि का इथे आली? याची माहिती मिळाली नसल्याने सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क कऱण्यात आले आहे.
वसईजवळील भुईगाव समुद्रकिनार्यावर गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक संशयास्पद बोट स्थानिकांना दिसली. या भागात बोटींचा वावर नसल्याने ही अनोळखी बोट कशी आली? याचा स्थानिक मच्छिमारांना संशय आला. ही बोट समुद्र किनार्यापासून दोन नॉटीकल मैल आतमध्ये आहे. कोस्टल गार्ड, मेरिटाईम बोर्ड आणि वसई पोलिसांनी बोटीच्या ठिकाणी पाहणी केली आहे. तसेच या घटनेची माहिती घेणे सुरू आहे. पण ही बोट कुठून आली..? ही कुणाची आहे..? तांत्रिक बिघाडामुळे थांबली की हिला अन्य काही कारण आहेत. याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र अनोळखी संशयास्पद बोट आढळल्याने मच्छिमार मध्ये खळबळ माजली आहे.