महाराष्ट्र

येवल्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे भिक मागो आंदोलन

Published by : Lokshahi News

पेट्रोल, डिझेल व गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या निषेधार्थ नाशिकच्या येवल्यात आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विंचूर चौफुली येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर भीक मागो आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरील वाहनधारक व येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांसमोर कटोरा धरत भीक मागण्यात आली.

पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किंमतीत झालेली भरसाठ वाढ कमी करावी तसेच जीवनावश्यक वस्तूची झालेली दरवाढ मागे घ्यावी, खाजगी शाळेतील सक्तीची फी वसुली थांबवावी. आदी मागण्या या आंदोलनावेळी करण्यात आल्या. दरम्यान,  मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा