थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nana Patole) जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून राज्यात 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून रोजी 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. तसेच नाना पटोले म्हणाले की,'जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अनेक राज्यात बॅलेटवर जेव्हा मतदान घेतलं जात आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे. शाहू, फुले आंबेडकर विचारांचे राज्य आहे.'
'या राज्यात निवडणूक आयोगाने आणि राज्य सरकारला आम्ही पत्र लिहिलेले आहे की त्यांनी या प्रक्रियेला मदत करावी. निवडणूक आयोगाने बॅलेटवर मतदान घ्यावे ही आम्ही मागणी केलेली आहे.' असे नाना पटोले म्हणाले.
Summary
'जिल्हा परिषद निवडणुका बॅलेटवर घ्या'
काँग्रेस नेते नाना पटोले यांची मागणी
पत्र लिहून निवडणूक आयोग, मुख्यमंत्र्यांकडे मागणी