थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Kolhapur) कोल्हापूरच्या तामगाव ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापूर विमानतळाच्या प्रवेशद्वारावर तामगाव ग्रामस्थांनी हे आंदोलन केलं असून कोल्हापूर विमानतळाशेजारील रस्ता खुला करण्याची मागणी या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
विमानतळ विस्तारीकरणात रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पर्यायी रस्ता न देता गेल्या वर्षभरापासून रस्ता बंद असून वाहतुकीसाठी अडचण निर्माण होत आहे. यासाठी लवकर कोल्हापूर विमानतळ शेजारून जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, ही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Summery
कोल्हापूरच्या तामगाव ग्रामस्थांचं आंदोलन
कोल्हापूर विमानतळाशेजारील रस्ता खुला करण्याची मागणी
विमानतळाच्या प्रवेशद्वारावर तामगाव ग्रामस्थांचं आंदोलन