crime Team Lokshahi
महाराष्ट्र

गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा! शिक्षकाकडूनच विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

क्रीडा प्रशिक्षकाला बेड्या

Published by : shweta walge

एका क्रीडा प्रशिक्षकाने (sports coach) आपल्याच विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचारांसह अमानुष मारहाण केली आहे. गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना डोंबिवलीतील मानपाडा (Manpada) परिसरात घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रामेश्वर पाठक (Rameshwar Pathak) असे अटक केलेल्या क्रीडा प्रशिक्षकाचे नाव आहे.

27 वर्षीय पीडित तरुणी, डोंबिवली परिसरात राहते. 2012 साली शाळेत असताना एका राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गेली होती. त्यावेळी तिचे कोच असलेल्या आरोपी रामेश्वर पाठक याने त्या पीडित तरुणीशी ओळख वाढवत प्रेमसंबंध प्रस्थापित करून शारीरिक संबध ठेवले. त्यातच काही महिन्यानंतर या दोघांच्या प्रेमाचे नातेसंबंध व्यवस्थित सुरु असताना 2019 नंतर दोघांमध्ये अचानक खटके उडायला लागले. त्यातच पीडित तरुणी दुसऱ्या मुलांशी बोलत असल्याचे पाहून आरोपी रामेश्वर तिला मारहाण करायचा, अशीच मारहाण 18 मार्च 2022 रोजी रामेश्वरने एका कारणावरुन लोखंडी रॉडने पीडित मुलीला अमानुष मारहाण केली. इतकच नव्हे तर त्याने तरुणीवर शारिरिक अत्याचार करत तुझे अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली.

आरोपीच्या अत्याचार व मारहाणीला कंटाळून अखेर पीडित तरुणीने आपल्या एका मित्राच्या सहाय्याने मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada Police Station) तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी रामेश्वर पाठकविरोधात बलात्कार, गंभीर मारहाण आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास मानपाडा पोलीस करीत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?