महाराष्ट्र

मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली; निवडणूक आयोगाचा निर्णय

महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे.

Published by : Dhanshree Shintre

महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील शिक्षक, पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर झालेली निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणुकीसाठी पुढच्या महिन्यात 10 जूनला मतदान होणार होतं. परंतु काही शिक्षक आणि पदवीधर संघटनांनी यावर आक्षेप घेतला होता. या काळात शाळांना सुट्टी असल्याने याचा मतदानावर परिणाम होईल असे शिक्षक संघटनांचं म्हणणे होते. याची दखल घेत निवडणूक आयोगाने घेतली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 2 मे ते 14 जूनपर्यंत सुट्टीचा कालावधी जाहीर केला असून शाळा 15 जून नंतर सुरु होणार आहेत. तसेच 17 जून ते 20 जून पर्यंत बकरी ईदनिमित्त उर्दू माध्यमांच्या शाळांना सुट्टी असते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने अनिश्चित काळासाठी ही निवडणूक पुढे ढकलली आहे.

दरम्यान, आता निवडणूक आयोगाने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी आमदार कपिल पाटील यांच्यासोबत दिल्लीत जाऊन भारत निर्वाचन आयोगाकडे मागणी केली होती. तर हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती. भारत निर्वाचन आयोगाने याबाबतची प्रेस नोट जारी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार

Pune : पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार; एकजण गंभीर जखमी

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य