महाराष्ट्र

लोकप्रतिनिधी असावे तर असे! शिक्षक संपावर, विद्यार्थ्यांसाठी सरपंच, उपसरपंच झाले शिक्षक

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अनिल ठाकरे | चंद्रपूर : संपूर्ण राज्यभरात सरकारी कर्मचार्‍यांचा संप सुरु आहे. यात प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांनीही सहभाग घेतला आहे. जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक संपावर गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात असल्याचे चिन्ह दिसताच विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे यासाठी आंबोली ग्रामपंचायतने पुढाकार घेतला. शाळा सुरु केली. विशेष म्हणजे, गावातील तरुण-तरुणींसोबत स्वतः सरपंच शालिनी दोतरे व उपसरपंच वैभव ठाकरे हे दोघंही शिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत.

जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील आंबोली हे तीन हजार लोकवस्तीचे गाव असून, या गावात एक ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत अडीचशे विद्यार्थी आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्य भरात शिक्षकासह सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपामध्ये जिल्हा परिषद आंबोली गावातील शाळेच्या सर्व शिक्षकांनी सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गावात भटकंती सुरू होती. पण, विद्यार्थ्यांचे ऐन परीक्षेच्या काळात शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आंबोली ग्रामपंचायतने पुढाकार घेतला.

गावातीलच उच्चशिक्षित युवकांची सभा घेऊन जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा संप मिटत नाही. तोपर्यंत सर्वांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे द्यावे व आपला अमूल्य वेळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी देण्यात यावे, अशी संकल्पना या युवकासमोर मांडली. गावातील युवकांनी हा प्रस्ताव स्वीकारला. सरपंच शालिनी दोतरे, उपसरपंच वैभव ठाकरे सह गावातील शिक्षित युवा हे विद्यार्थ्यांना शिकवित आहे.

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...