थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Teachers Protest ) आझाद मैदानावर आज शिक्षकांचा आंदोलन होणार असून जुन्या पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी एल्गार करण्यात येणार आहे. जुनी पेन्शन योजना सुरू करावी, टीईटी परीक्षेतील चुका दूर कराव्यात आणि इतर सेवा-सुविधा मिळाव्यात, या मागण्यांसाठी राज्यातील शिक्षक आज आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत.
आजपासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीने या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी त्या शिक्षकांची मागणी आहे.
Summery
आझाद मैदानावर आज शिक्षकांचा आंदोलन
महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीकडून आंदोलनाची हाक
मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, शिक्षकांची मागणी