थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nashik Tapovan) नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या कुंभमेळ्यासाठी देशभरातून अनेक साधू-महंत येत असतात त्यांच्या निवासासाठी तपोवनामध्ये साधुग्राम नगरी वसविली जाते. या कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार होते. यासाठी वृक्षतोड केली जाणार होती.
यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या वृक्षतोडी विरोधात नाशिककर, पर्यावरणप्रेमींसह सेलिब्रिटी देखील याला विरोध करताना पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार, राजकारणी यावर व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर साधू महंतांसाठी भव्य डोम उभारला जाणार होता.
हाच डोम पुढील 32 वर्षांसाठी खाजगी कंपनीमार्फत प्रदर्शन केंद्र म्हणून वापरला जाणार होता. BOT तत्त्वावर होणाऱ्या या प्रकल्पाला पर्यावरण प्रेमींनी विरोध केल्याचे पाहायला मिळाले. या सगळ्या विरोधानंतर अखेर या BOT तत्त्वावरील प्रदर्शन सेंटर उभारणीच्या 220 कोटी रुपयांचा निविदा प्रक्रियेला स्थगिती मिळाली असून आता तपोवनातील प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली असून मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकमध्ये या स्थगितीबाबत माहिती दिली आहे.
Summery
साधू महंतांसाठी उभारला जाणार होता भव्य डोम
तपोवनातील प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
मंत्री गिरीश महाजन यांनी दिली माहिती