महाराष्ट्र

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; 2 दहशतवाद्यांचा मृत्यू

दहशतवाद्यांबरोबर चकमकीत 3 जवान शहीद

Published by : Shweta Shigvan-Kavankar

श्रीनगर : स्वातंत्र्य दिनापूर्वी जम्मू-काश्मीरमधील परगलमध्ये उरी हल्ल्यासारखा कट फसला. काही दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु, यानंतर जवानांच्या सर्कतेमुळे दहशतवाद्यांचा कट फसला आहे. यावेळी दोन दहशतवादी मारले गेले.

स्वातंत्र्य दिनाचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या राजौरीपासून 25 किलोमीटर अंतरावर परगल लष्करी कॅम्पवर आत्मघातकी हल्ला केला. यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले. मात्र, या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. या परिसरात आता शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान, दहशतवाद्यांनी उरीसारखा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. परंतु, जवानांच्या सर्कतेमुळे हल्ल्याचा कट फसला.

दरम्यान, 2016 मध्ये पाकिस्तानातून आलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. यामध्ये १९ जवान शहीद झाले. त्याचवेळी 19-30 सैनिक जखमी झाले. चारही दहशतवादी मारले गेले. प्रत्युत्तर म्हणून भारताने पीओकेमध्ये प्रवेश केला आणि सर्जिकल स्ट्राइक केले आणि दहशतवादी लॉन्च पॅड नष्ट केले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gaza Situation : अन्न-पाण्यासाठी झुंजताना शेकडो पॅलेस्टिनी नागरिकांचे बळी

Google Online Courses : गुगलच्या 'या' मोफत कोर्सेसमुळे करिअरमध्ये प्रगतीची संधी

Rohit Pawar On ED Action : '...आणि म्हणून माझ्या एकट्यावर EDची कारवाई केली' रोहित पवारांनी सगळंच सांगितलं

Sambhajiraje Chhatrapati : 'युनेस्को गडकिल्ल्यांचे ब्रँडींग करेल, जतन आपल्याला करायचंय'; छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया