थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Thackeray Brothers ) महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.
सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता उद्यापासून ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभांच्या तोफा धडाडणार आहेत. आज ठाकरे बंधूंच्या शाखाभेटींचा शेवटचा दिवस असणार असून उद्या नाशिक मध्ये ठाकरे बंधूंची पहिली सभा होणार आहे. 10 तारखेला उद्धव ठाकरे यांची संभाजीनगरला सभा होणार असून 11 तारखेला राज आणि उद्धव यांची शिवतीर्थ येथे एकत्रित सभा पार पडणार आहे.
तसेच ठाण्यात आणि मुंबई उपनगरमध्येही ठाकरे बंधूंच्या सभांचा धडाका राहणार आहे. ठाकरे बंधूंच्या या सभांकडे सर्वांचे लक्ष लागले असून या सभेतून ठाकरे बंधू काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
उद्यापासून ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभांच्या तोफा धडाडणार
आज ठाकरे बंधूंच्या शाखाभेटींचा शेवटचा दिवस
उद्या नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची पहिली सभा होणार