थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Supriya Sule - Raj Thackeray) महापालिका निवडणुकांसाठी जोरदार तयारी करण्यात येत असून अनेक बैठका होताना पाहायला मिळत असून जागावाटपासंदर्भात अनेक चर्चा केल्या जात आहेत. यातच आता मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूसोबत लढणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा चार जागेवरून तिढा कायम असल्याचे पाहायला मिळत आहेत.
राष्ट्रवादीला हव्या असलेल्या 4 जागांवर मनसेने दावा केला असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीला हव्या असलेल्या चार जागावर मनसेचा दावा कायम असून त्यामुळे या चार जागांचा तोडगा काढण्यासाठी सुप्रिया सुळे आज राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत राष्ट्रवादीला 16 जागा मिळण्याची शक्यता असून आजच्या या चर्चेत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, तर 31 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. तर 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत.
Summery
मुंबई महापालिकेत पवारांच्या राष्ट्रवादीचा तिढा कायम
राष्ट्रवादीला हव्या असलेल्या 4 जागांवर मनसेचा दावा
सुप्रिया सुळे राज ठाकरेंशी चर्चा करणार