थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Mahesh Sawant ) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता मुंबई पालिकेत ठाकरेंचा महापौर बसणार असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारानं व्यक्त केला असल्याचे पाहायला मिळत आहे.
यासोबतच ते म्हणाले की, "पूर्ण भारतामध्ये आता आंदोलन होणार आहे. जो भारताचा एकमेव हक्क आहे लोकशाहीचा. आता आम्ही महानगरपालिकेच्या ज्या याद्या बघतो आहे त्यामध्ये आमचे माहिमचे 8 ते 10 हजार वोटर त्यांनी गाळलं आहेत."
"ही चोरी करत आहेत. तर त्यांना सुबुद्धी द्यावेत. थोड्या दिवसांनी पूर्ण भारतात त्यांच्याविरोधात जन आंदोलन सुरु होईल. महानगरपालिकेत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार." असे महेश सावंत यांनी म्हटलं आहे.
Summery
'माहिममधील 8 लाख मतदारांची नावं गायब'
ठाकरेंच्या सेनेचे महेश सावंत यांचा हल्लाबोल
पूर्ण भारतात भाजपविरोधात नाराजी- महेश सावंत