थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Uddhav Thackeray) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. यासाठी आता राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे सेनेची उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई पालिका निवडणूक ठाकरे बंधू आणि शरद पवारांची राष्ट्रवादी युतीत लढणार असून आज उमेदवारी यादीच्या स्वरुपात आदेश देणार असून त्याचे पालन करण्याचे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र अनेक इच्छुकांकडून आपलं तिकीट जाऊ नये यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
Summery
ठाकरे गटाची उमेदवारी यादी आज जाहीर होण्याची शक्यता
आज उमेदवार यादी काढून उद्धव ठाकरे आदेश देणार
मुंबई पालिका निवडणूक ठाकरे बंधू आणि शरद पवारांची राष्ट्रवादी युतीत लढणार