थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठका घेण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला समान जागा हव्या असून महाविकास आघाडीत समान जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जितक्या जागा मिळतील तेवढ्याच जागा शिवसेनेलाही हव्या असल्याची माहिती मिळत आहे. मनसे महाविकास आघाडीत आल्यास शिवसेनेच्या कोट्यातून मनसेला जागा देण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.
महाविकास आघाडीत 50 -50 -50 चा फॉर्मुला ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून महाविकास आघाडीत इतर पक्ष संघटना ही सहभागी होणार असून आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.
काल मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत महाविकास आघाडीची बैठक सुरू होती. बैठकीला काँग्रेस, शिवसेना ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी उपस्थित होती. काल झालेल्या बैठकीत 12 ते 13 प्रभागांवर चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला हव्या समान जागा
महाविकास आघाडीत समान जागांची मागणी
'काँग्रेस आणि राष्ट्रवादीएवढ्या जागा मिळाव्या'