महाराष्ट्र

‘हीच का तुमची नाइट लाइफ’; मनसेच्या संतोष धुरींचा आदित्य ठाकरेंना टोला

Published by : Lokshahi News

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातच कोरोनाच्या नियमांना केराची टोपली दाखवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वरळी भागातील पब्ज रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचा पर्दाफाश मनसेनं केला आहे. त्यावर हीच का तुमची नाइट लाइफ असा मनसेचे संतोष धुरी यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात ज्यात महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वाॅर्डचाही समावेश होतो, तिथले सगळे पब्ज वीक एंडला कसे फुल्ल सुरू असतात याची पोलखोलच मनसेचे नेते संतोष धुरी यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली आहे. सोमवारी रात्री 12.30 वाजेपर्यंत मोठी गर्दी करत या पब्जमध्ये तरुण तरुणी संगीताच्या तालावर थिरकताना दिसत आहे. यात कोरोनाचे नियम कसे पायदळी तुडवले जातायत हे अगदी स्पष्ट दिसतंय. मग सर्वसामान्यांना एक न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय आहे हे स्पष्ट दिसतंय, अशी टीका धुरी यांनी केली.

"कोरोनाबद्दलचे नियम फक्त सामान्य माणसांनाच लागू आहेत का ? धनदांडग्यांना सर्व काही माफ आहे का ? सर्वसामान्य लोकांनाच कोरोनाची भीती दाखवायची आणि श्रीमंतांच्या पोरांना नाईटलाईफ हे असं कसं असू शकेल" असा सवाल संतोष धुरी यांनी विचारला. "हेच का ते मुख्यमंत्र्यांच आवाहन ? मुख्यमंत्र्यांचं कुणी मंत्री ऐकत नाही. गर्दी करू नका सांगितलं तर राठोडसारखे मंत्री शक्तीप्रदर्शन करतात, आता तर त्यांचे मंत्री आणि पुत्र, युवराज पण त्यांचं ऐकत नाही का ? त्यांच्या मतदार संघात गर्दीला कोरोनाची भीतीच नाही का? हीच का यांची नाईटलाईफ ? मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत जनतेला नियम सांगतात आणि इथे त्यांच्या युवराजाच्या मतदार संघात सगळे पब्ज फुल्ल आहेत. याचाच अर्थ आता युवराजही यांचं ऐकत नाहीत का ?" असा प्रश्नांचा भडीमार धुरी यांनी केला आहे.

याचबरोबर आदित्य ठाकरे जिथे निवडून आलाय त्या वरळी भागात पब, दारू आणि धिंगाणा जोरात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या मुलाच्या मतदार संघात कोरोना दिसत नाही. नाईट लाईफच्या नावा खाली पेंग्विन मुंबईची वाट लावतोय तर दुसऱ्या बाजूला ह्याचेच मित्र हे क्लब चालवतात असा टोला निलेश राणे यांनी टोला लगावला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा