महाराष्ट्र

करुणा, धनंजय मुंडे यांची प्रेम कहानी मराठी येणार

Published by : Team Lokshahi

बीडचे (Beed) पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची प्रेमकथा आता पुस्तकाच्या रुपात सगळ्यांसमोर येणार आहे. माहितीमृनुसार धनंजय मुंडेची पत्नी करुणा धनंजय मुंडे (Karuna Dhananjay Munde) या लवकरच एक पुस्तक प्रकाशित करणार असून त्यामधून आपली प्रेमकथा सांगणार आहे. या बातमीमुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.


करुणा मुंडे यांनी फेसबुक (Facebook) पोस्टमधून ही बातमी दिली आहे. दरम्यान आज कोल्हापुरात (Kolhapur) माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे आणि आपली प्रेमकथा (Love story) पुस्तकाच्या रुपात येणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी करुणा म्हणाल्या धनंजय आणि माझी प्रेम कहानी मराठीत (Marathi) येणार असून त्यावर काम सुरु आहे. माझ्या जीवनावर आधीरित सत्य प्रेम जीवनगाथा लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. पुस्तकाच (book) प्रकाशन लवकरच केले जाणार आहे.
यावेळी करुणा म्हणाल्या धनंजय मुंडे यांनी स्वत:ची सहा मुले लपवली असून अनेक बायका त्यांनी लपवल्या आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकीत (election) धनंजय मुंडे यांना उमेदवारी अर्ज भरताना अडचणी येणार आहेत. माझ्याकडे यासंबंधी कायदेशीर पुरावे आहेत. त्यामुळे अर्ज करण्यासाठी मला कोणतीही अडचण येणार नाही.
करुणा मुंडे आज कोल्हापुरात असून त्या उत्तर विधानसभा (Assembly) पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. करुणा शर्मा यांनी शिवशक्ती सेना पक्ष (Shiv Shakti Sena) स्थापन केला असून याच पक्षाकडून अधिकृत उमेदवार असणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Adani Group : अदानी समूहाच्या कंपन्यांना सेबीकडून क्लीन चिट

Rohit Pawar : "कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर पाऊल उचलणार", कोकाटेंनी दिलेल्या मानहानीच्या नोटीसवर रोहित पवारांचं वक्तव्य

Gold Silver Rate : ग्राहकांची चिंता मिटली! लवकरच सोने-चांदीच्या भावात होणार मोठी घसरण; कधी ते जाणून घ्या

Chhagan Bhujbal : "अंतरवालीतील दगडफेक शरद पवारांच्या..." अंतरवालीतील दगडफेकीवर भुजबळांनी केला पडदाफाश