थोडक्यात
गृहनिर्माण सोसायटीवर प्रशासकाची नेमणूक आता फक्त एका वर्षासाठीच
हायकोर्टाकडून निबंधकांना आदेश
प्रशासकाला कोणत्याही परिस्थितीत 1 वर्षापेक्षा मुदतवाढ देता येणार नाही
(Housing Society) गृहनिर्माण सोसायटीवर प्रशासकाची नेमणूक आता फक्त एका वर्षासाठीच करण्यात येणार आहे. हायकोर्टाकडून निबंधकांना असे आदेश देण्यात आले आहे.
निवडणूक लवकरात लवकर घेऊन सोसायटीचे कामकाज पदाधिकाऱ्यांकडे सोपवले जाईल याची काळजी निबंधकांनी घ्यावी, तसेच अनिश्चित काळासाठी सोसायटीवर प्रशासक नेमता येणार नाही.
यासोबतत तीन महिन्यांत निवडणूक घ्यावी, प्रशासकाला 1 वर्षापेक्षा मुदतवाढ देता येणार नाही,असे कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास निबंधकावर कारवाई करण्यात येईल, असे देखील सांगण्यात आले आहे.